Friday, June 1, 2018

सुमेधा


"'Fem' कैसा नाम हुआ? Salon Industry में अपना क्या काम भाई?"
खरंय. डिजिटल मार्केटिंग च्या कॉलेज मध्ये तृतीय वर्षात पदवी संपायला येत आहे आणि प्रश्न तशीच आहेत. आमचं तिथं काय काम? Campus Interview मध्ये Amazon आणि flipkart  सारख्या कंपन्या दूर. या जर्मन कंपनीत आपण काय करायचं? ते पण महिला उद्योगांमध्ये? असो. Salon Industry बद्धल फारसं माहिती नसल्यावर होतं तसं. फेसबुक स्क्रॉल करतांना मी निखिल काय बोलत आहे याकडे जास्त लक्ष दिलं नाही. विचार तर केलाच नाही. गरगर फिरणाऱ्या अंगठ्याला अचानक ब्रेक लागलं. हि मेंदूची आणि डोळ्यांची भागीदारी नव्हती. इथं मनही आडवं आलेलं. स्क्रीन वर सुमेधा चा फोटो होता. सुमेधा... १०वि पर्यंत तिला पाहत असायचो. त्यावेळी फेसबुक असतं तर दोघांमध्ये Ice Break व्हायला एवढी वर्षं लागली नसती. 'On the way to Goaaaa..' च्या कॅप्शन बरोबर पडलेला फोटो. निरखण्यात वेळ निघाला. तिला गोव्याला पोचायला १६ तास लागतील. मी मिनिटात पोचलो होतो. सांगितलं ना, मनही होतं तिथं

    "यार सुन, Apti और GD की बात है बस! फिर डेस्टिनेशन इंटरव्यू।  निशांत, सुन तो रहा है ना भाई? दोनों आरामसे पार करलेगा तू।  कंपनी एक्सपेंसेस पे जाएंगे भाई।  कर देते हैं।" निखिल ओघात बडबडत राहिला. कॅन्टीन समोर नोटीस बोर्ड नसावं. कधीच नसावं. खाऊन पिऊन बाहेर पडावं आणि आणि ताण येण्यासारख्या गोष्टी पहाव्यात? कदापि नाही! दुपारी ला Apti(Aptitude Test) होणार. मग पासून -.३० पर्यंत GD(Group Discussion) उरकले जाणार. मग .३० पर्यंत निकाल. जर्मन कंपन्या जोरात असतात! डोक्याचे चक्र तेव्हा सुरु झाले जेव्हा मी त्या नोटीस खाली ठळक अक्षरात पाहिलंInterview Location: Goa
सिरीयल, रोल नंबर, अल्फाबेट, कुठल्याही परीने निखिल आणि मी मागे पुढेच यायचो. ३० मिनिटांची apti १५-२० मिनिटात पार पाडली. निखिलनं पण केलं. अर्थात सोपी होती प्रश्न. मराठी/हिंदी वा व्हर्नाक्युलर मिडीयम मध्ये शिकलेली पोरं करून टाकतात पार. जानेवारीत बँगलोर सायंकाळी वाजता पण सकाळ झाल्यासारखं आभाळ रंगवलेला असायचा. या शहरावर वातावरण पाहताच प्रेम व्हायला लागतं. इथं 'थर्ड इअर' चा अवजड ब्लेजर गर्मी देत नसे. आतमधनं निकालाची घंटी फोन वर धडकली तसा पुढच्या राउंड साठी आत गेलो. आम्ही दोघेही GD मध्ये पोचलो होतो. १०-१० जणांच्या समूहांना एकानंतर एक आत बोलावण्यात आलं. दुसऱ्या समूहात आम्ही होतो. कुठलातरी एक विषय देऊन त्यावर समूहात चर्चा रंगवली जाते. चांगलं बोलणं, भाषेवरील पकड आणि इतर बऱ्याच गोष्टींवर आधारित निवड केल्या जातात.
आम्हाला विषय दिला गेला,"Road Accidents in India and USA".  समोर एक महिला आणि एक पुरुष जज. १० मिनिटांचा वेळ आणि आमच्याबरोबर अस्खलित इंग्रजीत बोलणारी देशभरातली निवडलेली मंडळी असावी. अशा कार्यक्रमांमध्ये ओरडणाऱ्यांनाच वाव मिळतो असा बाळकडू यांना पाजलेला असतो. GD सुरु झाला तसा आमच्या बॅचमेट 'मिस लखनौ' उठल्या आणि भारतातील रस्ते आणि अमेरिकेतील रस्ते यांच्यातला फरक सांगायला लागल्या. किती ते खड्डे, चिखल आणि बैलगाडी पण न चालावी असे उथळ रस्ते. खरंय कि. जज मॅडम हसल्या. उत्तम वक्त्यांचा उदो उदो झाला. सातव्या मिनिटाला निखिलने पण भारतीय रस्त्यांची दुरावस्था वर विशेष भाषण दिलं. "I'd like to make a point here!" बरोबर निखिलनं शासनासोबत आम्हा सामान्य नागरिकांना पण दोषी ठरवलं. आता बोलण्यासारखं काहीच उरलं नाही असा आव आणत क्षणाची शांतता पसरली. निखिल नंतर एक-दोघांनी मुद्धे मांडून पुढील १ मिनिटाचा पुरेसा काटा काढला. मला हसायला येतं जेव्हा सर्व जण एकमेकांकडे पाहतोय असा अभिनय करतांना चोरत त्या जज लोकांकडे पाहत असतात. एक मिनिट आणि मी. दोनच गोष्टी उरल्या होत्या तिकडे. Conclusion साठी तशी मारामारी असते. पण आधीच हात मारलेला.
"I wonder most of us believe it is the government who is responsible for road mishaps. Some of us feel the quality of roads is what is to be worked upon. I had read about roads in USA in World of Facts. Super quality, I must say. Excellent road signs, marks and checks. Still why there had been 0.3 million deaths happened in road accidents? Who is responsible for it? I'll tell you what I feel. Governments work using the money that we generate through the taxes. It is us who need to learn how to drive, how to read signs and so on. We are equally responsible. The Education is responsible .." Conclusion महत्वाचे असते. १ मिनिट मी खेचलं शेवट हाती ठेवण्यासाठी. सगळ्यांसाठी शासन आणि कार्यपद्धती महत्वाच्या होत्या. माझ्यासाठी शिक्षण महत्वाचं होतं.  आकडेवाऱ्या खऱ्या नव्हत्या. पण नियत खरी होती माझी. मार्ग सुकर झाला. सोबत्यांच्या मनातल्या शिव्यांच्या आरासपलीकडे गोव्याचं स्वप्न दूर नव्हतं! (त्यांच्या शिव्या कारण त्यांनी आकडेवाऱ्या शोधल्या होत्या.) गुगल हल्ली जगू देत नाही!
दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला. ११ चं विमान १२ वाजता दाबोलीम च्या विमानतळावर सोडणार होतं. 'भलता पैसा ओतला असेल मला आणि सोबत दुसऱ्या विविध कॉलेजच्या - जणांना घेऊन जायला Fem नं.' असा विचार मनात येताच आतल्या मॅगझीन वर त्याच कंपनीच्या Advertisements पाहिल्या. 'ओह, Tieups हा?' भरकट्या विचारांची मैफिल फार काळ टिकली नाही. फोन मधला मेसेंजर साक्ष होता. सुमेधाचं चित्र एव्हाना विमानाच्या खिडक्यांतून ढगांमध्ये दिसायला लागलं होतं. हलक्याशा भुऱ्या केसांची रास, मोठे डोळे, अलगद जाड असे गुलाबी गाल आणि भुवया/ओठांची तर विलक्षण महिमा. ती माझा अनेक वर्षांपासूनचा आवडता विषय. कुठल्या GD मध्ये तिला कोणी topic म्हणून द्यावं कधी. ती पण हार मानेल माझ्यापुढे. हिवाळ्यात दिवाळीनंतरच्या धुक्यात तिच्या घराकडनं जायचो तेव्हा फक्त तीच दिसायची. बाकी बेरंग घरांना धुकं झाकायचं आणि रस्त्यावरील लोकांना माझं मन.
मी तिला कधी बोललो नव्हे आयुष्यात. मेसेंजर वरील बोलणं बोलणं नसतं कधीच. अशा कथांमध्ये तर मुळीच नाही. निखिल विमानात सोबत असता तर त्याला सांगितलं असतं. पण GD मधनं तो निघाला नाही. माझ्याबरोबर फक्त मिस लखनौ निघाल्या. बाजूच्या सीट वर बसलेल्या मिस लखनौ ला कोणत्या भाषेत बोलायचं मी? माझी कुठलीही भाषा तिला पटत नाही. माझ्यासारखे लोक अशा जागी पोचू शकतात यावरही तिचा विश्वास नाही! दोघांनी एकदाच पाहिलं आणि एकदाच डोकं फिरवलं. काहीही बोलणं झालं नाही पुन्हा. झाकीर खान खरं बोलतो, विमानात बसल्यावर सगळ्यात महत्वाचे ढगच असतात!
    विमानतळावर उतरल्या उतरल्या ATM गाठलं. तिथं पोचेपर्यंत सुमेधा चे अपडेट्स तपासले. 'कलंगुट' च्या रिसॉर्ट मध्ये नेमकंच पोचलेली ती. लवकरच पोचली. 'बिझनेस मीट' चे हॅशटॅग मला समजणारे नव्हते. 'फार्मासिटिकल कंपन्या इथे काय उद्योग करत असतील? गोव्यात लोक औषधी घेतात का?' माझ्याकडे प्रश्नांची माळ आहे. तिला देखील ते ठाऊक आहे. पहिल्या संभाषणात तिचा मेसेंजर हँग केलाय मी! ATM मध्ये एक उंच महिला बऱ्याच वेळ पासून पैसे निघण्याची वाट पाहते आहे. काचातून डोकावतांना तिने मला पाहिलंय आणि संशयाची तिची नजर मी देखील पारखली आहे. आत मध्ये गेलो आणि मशीन पैसे सोडते तिकडे हात मारला. पैसे निघण्याचा करकराट आणि 'Haww Thankyou!' एकदाच ऐकायला मिळाले. 'Welcome to India!' म्हणत मी त्या फ्रेंच महिलेचं स्वागत केलं. पैसे काढून मी पण बाहेर पडलो. विमानानं २४ अंशापासून ४२ अंश तापमानात एका तासात आणलं होतं. पणजीच्या एका हॉटेल मध्ये आम्हाला पोचवण्यात आलं. South Zone च्या पन्नास एक विद्यार्थ्यांचं चांगलंच स्वागत झालं. West मधनं पण बरीच मंडळी अवतरली होती. अहमदाबाद ते कोची मध्ये गोवाच सर्वात योग्य जागा असेल, नाही का? 
  वाजता पहिल्या राउंड ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता दुसऱ्या राउंड ला पोचायचं आहे. 'Please be on time at Niravana!' एवढं ऐकलं कि निर्वाना तिथल्या Banquet चं नाव असेल हे समजणं अवघड नव्हतं. पण 'निर्वाना' का? या वाक्यात आपलं अंतिम संस्कार होत असल्याची भावना जागृत होते. 'काहीही नाव अरे!' तसं जेवण संपवून मीच पहिले पोचलो. सोबत इकडून तिकडून - जण पोचले. अशा जागी पोचलेली लोकं एकमेकांना पाहून काहीही करण्यास तयार असतात. कोणी पाकिटातलं आईचं फोटो काढून पाहिलं कि दुसरा लगेच मोबाईल मध्ये आईचा फोटो शोधायला तयार. म्हणजे अक्षरशः काहीही कोणीही केलं कि लागलीच अनुकरण! मी बिंदास होतो, 'More than Punctual huh?' च्या उच्चारासह माझा इंटरव्यू सुरु झाला. राउंड मध्ये भरपूर प्रश्नांना उत्तरं यायची नाही तेव्हा फिरवाफिरवित सारासार करून टाकली. ज्या प्रश्नांची उत्तरं येत ती मस्त पॉज घेत सुरेख हावभावांसह दिली. इंटरव्यू इंटरव्युव्हर ला जिंकण्यासाठी असतात. तुमच्या ज्ञानाची तपासणी नेहमीच केली जात नाही.
असो. मला याहीपेक्षा महत्वाचं काम होतं. 'मिस लखनौ' सोबत अजून एक माणूस मी वार्तांसाठी निवडलेलाच होता. बाहेर पडायचं होतं. सुमेधाला शोधून भेटायचं होतं. मला गोवा बऱ्यापैकी ठाऊक आहे. दूरवर जेट्टीच्या आवाजात मी किरायाने घेतलेल्या Avenger चा आवाज मलाच येत असावा. पुढे कलंगुटच्या वाटेवर पोरवोरीम ची हिरवळ आणि सुंदर डोंगराईचा नजारा मनाला बाग बनावणारा होता. पेट्रोल टाकलं तसं तिचा रिसॉर्ट गाठला थेट. तिचा नंबरही नव्हता आज. त्याहीपलीकडे हि भेट चालत फिरत झाल्याचा आव आणायचा होता. चेकइन मध्ये अजून कोणाचं नाव नव्हतं. ती एकटीच असेल हे जाणून होतो.
   पाण्याचा घोट घेत घेत जीव अर्ध्या तासात कासावीस झाला. ती गेली असेल का कुठे? याच विचारात पडलो. ती बॉटल संपवून फेकली आणि गाडीचा स्टॅन्ड काढावा म्हटलं तसं एका महाशयांनी खांद्यावर हात ठेवला. ' साला, ये गोवा है गोवा। तुम्हारे... " त्यानं पुढं काही बोलावं त्यापूर्वीच मी थांबवलं. 'हां तो क्या?' बॉटल उचलून योग्य विल्हेवाट लावली. त्या व्यक्तीकडे वळालो तसा त्याचा 'I Love My Goa' चं भाषण सुरु होणार असल्याची जाणीव होतीच. गोव्यातली लोकं पर्यटकांना (विशेषतः भारतीयांना) असे भाषण देत असतातच. चूक आपली असतेच, पण ते वाढीव बोलतात. 'सुन, वो आगेका भाषण मत देना अब! काम होगयाना अंकल? अब आगे बढनेका! chill मारनेका!" थोडाफार थंडावलेला पार पुन्हा चढवत साहेब स्कुटर कडे वळले. बडबडतच गेले. हे सगळं होतंच होतं कि समोरच्या कॉफी शॉप मधनं सुमेधा बाहेर पडतांना दिसली. 'शप्पथ... कहर.. दिसलीच ती शेवटी!' फिकट निळ्या रंगाचं टॉप आणि जीन्स? गोव्यात जीन्स कोण घालतं? सोड. ती.. ती दिसली!
    'काय बोलू? कसं बोलू?' वगैरे विसरून गेलो. 'सुमे..धा..' म्हणावं तसं तिनं वळून पाहिलं. 'निशांत? इथे?' एक मिनिटात तिच्या डोळ्यात डोळे ओतून गाव ते बँगलोर आणि बँगलोर ते गोवा, अख्ख कथन करून टाकलं. 'मोकळ्या केसांमध्ये ती अजूनच बहरते कि!' मनी गोष्टी शंभर आपल्या!
'काय करतेस?' मी विचारलं.
'बिजनेस मीट!' तिनं सांगितलं.
'नाही तसं नाही. अच्छा. I mean आत्ता काय करणार आहेस?' मी काहीतरी बोलत होतो.
'मला गोवा फारसं माहिती नाही. आज तर फिरणार आहे. मला उद्या काम आहे!' तिचं उत्तर होतं कि माझ्या येणाऱ्या ऑफर ला होकार?
'मला माहिती आहे. चालशील? आपण जाऊया!'
अशी धाव तर मी कधी 'Mario' मध्ये पण नाही घेतली. थकलेला पण सुरेख आवाज तिचा. 'हो' म्हणायला वेळच दिली नाही मी. मला नकार आवडत नाहीत. त्यांना माझ्याकडेही जागा नाही. तिला Avenger वर बसवून फिरवेल हे मी अकरावीला असतांना RHTDM पुन्हा पाहिला होता, तेव्हाच ठरवलं होतं. माझी सगळी स्वप्न काय देव दोनच दिवसात पूर्ण करायला निघाला कि काय? भन्नाट सफर ती पण. तिला 'कांदोलिम' चा किनारा दाखवतांना मानेवर 'S' चा टॅटू पण काढून घेतला. Temporary! कारणं द्यायला तशी शंभर होती माझ्याकडे पण तिनं विचारताच मोठ्या शंका उत्पन्न केल्या. कोणी साहजिकच विचारलं असतं, S कशासाठी? नाव तर N पासून सुरु होतं. फिरते डोळे उत्तर देतात. मी, तो S आणि तिचं मिनिटभर एकलग माझ्याकडे पाहणं. शांततेत बरीच प्रश्न उत्तरं झाली असतील. नसतीलही. पण मला शंका होती. आम्ही ट्युशन मध्ये एकत्र असायचो त्यावेळी नजरा मिळाल्याच्या आठवणी आहेत माझ्याकडे. त्यावेळची भीती नाही पण आता. त्या मोठ्या बोलक्या आणि धुंद डोळ्यांचे मोल मला ६०० किलोमीटर ओढून आणू शकतात. अफाट ताकद असते या भावनांमध्ये.
    या शांत किनाऱ्यावर खूप वेळ बसायला होत होतं. पण सायंकाळी अवतरलेले विदेशी पाहुणे आणि त्यांच्याकडनं पैसे खेचायला निघालेले भिकारी यांचा थयथयाट नकोसा व्हायला लागला. "तो किल्ला कुठे आहे रे?"
"जवळच आहे. चल!"
Aguada दूर नाही. तिला पहायचं असेल तर कसच नाही! १०-१२ मिनिटात पोचलो. फिरून झालं, तसं KFC गाठलं. ती जात नाही फास्ट फूड खायला पुण्यात कधी. आम्ही दोघे आता मोठ्या शहरांमध्ये राहतो. पण फरक तिने जोपासला. तीला try करायला आवडेल असं वाटलं. व्हेज बर्गर बरे आहेत तसे. दोघेही शाकाहारी हे विशेष. निरंतर गप्पांमध्ये तिचा विलक्षण विश्वास दिसून येत होता. सेल्फीला नकार नाही म्हणजे खूप काही समजून जायचं. थोडंफार फिरून घ्यावं म्हणत बाजाराकडे गाडी वळवली. तिकडे Turqouise Gemstone सारखं दिसणाऱ्या पेन्डन्ट्स वापरून बनवलेला Necklace तिला आवडला. मी तिला सांगताच तो घेऊन टाकला. तिला किंमत जास्तीची वाटली असेल. पण ती फिरत असतांना भाव करायला मला खूप वेळ लागला नाही.
       दोघांसाठी Neon Bands पण घेतले. Sinquerim च्या छोट्याशा किनाऱ्याकडे गाडी वळवली. समुद्र रात्री किती भयाण वाटतो. पण ताऱ्यांसोबत एकदाच पहायला मिळाला कि भावतो मनाला.
'मस्त आहे रे हि जागा!'
'हो, मलाही पहिल्यांदा पाहिल्याबरोबर आवडली! इकडे कोणी येत पण नाही या वेळेला.'
'मग आपण काय करतोय?' तिनं हसतच विचारलं.
'आपण? आपण शोध घेतोय कोणी येत का नसेल याचा? भूत असेल कदाचित!' हाती घातलेला band रात्री चमकत होता. Blue Neon म्हणजे रंगाचं मनुष्यावर असलेलं प्रेम.
'भूत? checkin पाहिलंस का तू भुताचं?" तिनं ओठ दाबत (हसू आवरत) विचारलं. प्रश्न खोल होता. मी तिला भेटणं साहजिक नव्हतं. ते Planned  होतं असा घणघणात आरोप झाला. कारण मी तिचं फेसबुक वर टाकलेलं Checkin पाहूनच अवतरलो होतो.
"नाही. मी checkin पाहत नाही!”
"फक्त 'Love' रिऍक्ट करतो तर?" अरे देवा. मी तो तिच्या गोव्यात अवतरण्याच्या checkin वर रिऍक्ट केलेलं होतं. आपल्या जीवनात अशा अडचणी कशा आपल्याच मूर्खपणाने येत असतील? असो. Foolishness to Opportunity चे फंडे आयुष्यभर ऐकलेत मी. वापर कधी करेल?
"भुतांना सहवास आवडतो आपला तर कशाला विचार करायचा म्हणतो!" मी आणि ती एकदाच हसलो. या संभाषणांना अंत नव्हता. लाटांवरती चमकणाऱ्या चांदण्यांची मैफिल ती. मातीवरती हात पसरत कधीच खड्डे करून ठेवले आम्ही. हा प्रसंग जणू संपायलाच नको होता. धडकी भरावी अशा लाटांचा आवाज देखील प्रेमळ वाटायला लागला. ती बोलता बोलता थांबते  तेव्हा गाल ओढायला होतात तिचे. सुमेधा वेडेपण आहे माझं. तिला सांगू कसं?
डोंगर, कपारे, तलाव प्रसंगी नद्या आणि समुद्र सगळं पार करत तिला सोडून परत हॉटेल मध्ये पोचलो. एवढा रमलो कि नंबर घ्यायचं विसरून गेलो. तिला कळालं असेलही, पण ती कुठे मला सांगेल ते? उद्या भेटू ठीक. पण कुठे आणि कसं? ते आकस्मात भेटणं वारंवार ते पण फक्त सिनेमांमध्ये होत असेल. आजकाल तर तिकडेही होत नाही. हि कुठून भेटणार मला.
सकाळी उठायला उशीर झाला तसा. पण इंटरव्यू कडे धाव घेतली. आज ब्लेजर घालून बसायचं होतं. माझा क्रमांक यायला उशीर असेल. इंटरव्यू रूम ला 'Hot Room' नाव दिलेलं कोणीतरी. हे बहुदा अमिताभ रावांच्या 'Hot Seat' वर आधारित असेल. पण मला यावर तसूभर हसू पण आलं नाही. मनात वेगळंच काहीतरी होतं. त्या Hot Room मधून एवढ्यात मिस लखनौ बाहेर पडली. मिस लखनौ चं खरं नाव 'रोमा'. 'डॉन' येण्याअगोदर ठेवलं अर्थात तिच्या आई वडिलांनी. आईच्या आणि वडिलांच्या नावातली आद्याक्षरं जोडून तयार झालेलं नाव ते. प्रचंड बुद्धिमत्व या रोमाचं. इंग्रजीला तोड नाही. त्यात ती सुंदरही. हुशार आणि सुंदर मुली क्वचितच सापडतात. ती त्यातली एक. तिला आज नकळतच विचारलं आत काय विचारलं ते. विशेष, तिनं सांगितलं देखील. मला स्त्रियांबरोबर माझं वागणं तासभर सुधारण्याचा सल्ला पण दिला तिने. तसं पहायला गेलं तर मी मिस लखनौ च्या कुठल्याही मैत्रिणीला नीट बोललो नाही आजपर्यंत. त्यांचंदेखील तेच. पण आमचं संभाषण एकमेकांना पटकन Catch होतं हे दोघांनाही आश्चर्यचकित करणारं होतं. मी वाट पाहत बसलेल्या खुर्ची पासून २० किलोमीटर दूर सुमेधा होती. या इंटरव्यू पेक्षा मला ती महत्वाची होती.
      आता गेलो तसं प्रश्नोत्तरं झाली. काही वेळाने मला माझ्या वैयक्तिक जीवनावर अनेक प्रश्न विचारले गेले. त्यांची उत्तरं मी बनावटच दिली. थोडक्यात अशी कि ती मला भावनिक, उदारमतवादी आणि सौम्य दाखवतील. स्रीयांसोबत वागणुकी संदर्भात पण विचारलं गेलं. मी काळजीने वर्षानुवर्षे एका जमातीवर होत असलेल्या अत्याचारातून नुकतंच मुक्त होत असलेल्या स्रीजातीचा मला किती अभिमान आहे ते कळवलं. वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या सर्व माता भगिनींना पण वदंन केलं. अर्थात 'Fem' साठी काम करायला असाच तरुण लागणार. स्त्रियांविषयी आदर बाळगणारा, त्यांना जाणणारा आणि त्यांनाही आपलंसं वाटेल अशा गोष्टी Creativity मधनं समोर ठेवणारा. रोमा स्मार्ट आहे. मला आज पूर्णपणे उमगलं. इंटरव्यू संपवून मी वाट धरली. पुन्हा त्या दोघांना काहीही असेल तर कळवायला सांगितलं. कलंगुट कडे जातांना तिला मेसेंजर वर पहिलेच मेसेज केलेला. सुमेधा नक्की काय करत असेल? तिचं काम झालं असेल का? १०० विचार राव!
पुन्हा तोच रस्ता. भरधाव वेग आपला. ११.३० च्या प्रखर उन्हात मध्ये बास्कीन रॉबिन्स पाहून थांबलो. आईस्क्रीम खाणं ढोंग होतं, तिचं काही उत्तर आलं का ते पाहत होतो. नाही. अजूनही नाही. रिसॉर्ट गाठलं. इकडे तिकडे फिरत - जागी कॉफी झाली. कॉफी लिक्योर नावाचा प्रकारही पाहिला. सुमेधा काही दिसेना. वाजून गेलेले. अंगावर ब्लेजर. त्या झळांचं दुःख सांगायला नको. शेवटी आतही गेलो. चौकशी केली तर आली सकाळीच बाहेर पडलेली अजून आली नव्हती. मोठ्या विनावणीनंतर त्यांनी मला तिचा नंबर दिला. फोन च्या पहिल्या रिंग वर तिचा आवाज ऐकला.
"कुठे आहेस तू?" मी विचारलं.
"पणजीत. मिटिंग इकडेच होती ना." म्हणजे मी उगाच दूर आलो इतक्या? हि तरी कशाला इकडे राहत होती? कोणीतरी सल्ला दिला असेल रिकामा. गोंधळ झाला हा!
"तू थांब. तिथेच येतोय."
"अरे पण तुझा इंटरव्यू? काय झालं त्याचं?"
"झालं गं ते. थांब येऊन सांगतो!"
अर्ध्या तासात तिच्या समोर उभा टाकलो. स्टिलेटोस.. वाह. हाय वेस्ट लग्गीन्ग्स. काल तिच्या फॅशन सेन्स वर डोकं आपटलेलं मी. आज तोड नव्हता तिला. केसं बांधून पण भारीच दिसते कि ती! लाइटीश ऑरेंज नेकलाईन क्रॉप टॉप आणि ती.. अहोभाग्य आमचे! तिनं रस्ता रोको करायला एकटंच उभा टाकली तरी झालं..
पुन्हा इकडच्या तिकडच्या वारेमाप गप्पा मारतांना मी तिला घेऊन शोराओ गाठलं. नदीवरील छोटंसं बेट ते. मांडवी पुढे समुद्राला मिळते कशी ते दिसेल इथून. सोबत छोटंसं जंगल आणि त्यात हजारो पक्षी. Bird Sanctuary नावाजलेली होय. राफ्ट वरुन उतरतांना तिनं हाती हात दिला. सार्थ झाल्याची भावना इथे! गोंडस एकदम ती! मऊसर हात. मी Fem चा मार्केटिंग हेड असतो ना तर ब्रँड अँबेसेडर हीच असती.
"कसं वाटलं मग गोव्यात येऊन?" मीच ठरलो Ice Breaker! पोरी मेसेज स्वतः करत नाहीत, संभाषणाला सुरुवात पण नाही. नियमच जणू तो!
"हे खूप सुंदर आहे." कमानीसारखं ओवलेल्या छोट्या झाडांकडे पाहत ती म्हणाली.
"आहेच ते. नदी आहे पुढे. अजून भारी!" माझं Goa Tourism सुरूच होतं.
"आपण हळूच चालूया का?" तिनं विचारलं. विचारलं नाही, आज्ञाच दिली. हाती कुठलंतरी तंत्रज्ञान असायला हवं. पक्ष्यांनाही हळुवार आमच्याबरोबर चालायला भाग पाडलं असतं. पण आपण हतबल सृष्टीपुढे. तिच्यापुढे तर अजूनच.
"हो!" मी फक्त होकार दिला. ती कालपेक्षा वेगळी होतीच. मंद मंद हसतांना इकडे तिकडे पाहतांना मी तिला कधी पाहिलं नव्हतं.
"तू परत कधी जाणार आहेस?" तिनं प्रश्न विचारला. थांबा! तिनं विचारला? ती विचारते पण?
"मी मला कॉल आला कि जाईल. तू?" मी बंदूक फिरवली.
"उद्या." ती म्हणाली.
"नको वाटतं यार जायला. राहून जाऊ असं वाटतं इकडेच!" मी बोललो आणि तिने हात पकडला. किलबिलाट थांबला. पानांची सरसर पण. नदीचं अस्तित्व देखील हरवलं. श्या.. हे कसं झालं? मी तिचा दुसरा हात घट्ट पकडला. बराच वेळ गेला.
"अरे बोल सुमेधा काहीतरी.. " यावेळी मी काहीतरीच बोललो. नकोसं असं.
"तूला आवडतं का निशांत माझ्याशी बोलायला?" हा कसला प्रश्न झाला बरं? रोमा ने विचारला असता तर थेट 'नाही..हट!' म्हणालो असतो. हि सुमेधा होती. हि असं कसं विचारू शकते? एव्हाना किनाऱ्याकडे पोचलो होतो. दूरवर चाललेली नदी पुढे समुद्राला भिडत होती. सूर्य मावळायला आला होता. बोटं अडकवून धरलेलं हात कोणीही सोडलं नाही. बराच वेळ झाला.
'सुमेधा, एक सांगू? का समजून घेशील? सांगत सांगत १२ वर्ष गेली. आपल्या इतक्याशा जीवनातली १२ वर्ष.. " तिनं मधांतरीच थांबवलं. खांद्यावरती हात ठेवत मावळत्या सूर्याकडे पाठ केली. पुन्हा धडकीच भरली.
"पुण्याला कधी येतो आता?" तिच्या प्रश्नानं डोळ्यात हलकं पाणीच आलं. मिठीत होती ती, त्या सूर्याची कोवळी किरणं आणि उभ्या आयुष्याची स्वप्न.. मोबाइलवरती रोमाचा मेसेजही वेळेवर पोचलेला. "We've done it!"