Thursday, March 9, 2017

वाटून दिलेलं Freedom of Speech

मी गुरमेहर बद्दल लिहिलं आणि त्यानंतर लागोपाठ बऱ्याच वर्तमानपत्रांनी आपल्या अग्रलेखांमध्ये तिच्या चांगल्या बाजू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला हे सर्व योगायोग! पण कमाल आहे, खोट पडत असलेल्या एका तरुणीला वाचवायला संपूर्ण 'आदर्श Liberal' समाज कसा जागा होतो. आणि ती खोटी पडली कशी ते मागील ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे. हा blog लिहिण्याचं कारण इतकाच की 'Selective Outrage' नावाची गोष्ट आता डोक्यात भणभणायला लागली आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त निवडक लोकांसाठी मर्यादित उरलय.

गुरमेहर कौर आणि ती Endorse करत असलेली संपूर्ण टीम फक्त निवडक गोष्टींवर चर्चा करायला तयार असते हे कधी लक्षात घेतलं का आपण? मी 'सुरेश भटेवरा' यांचं लेख वाचलं लोकमतच्या संपादकीय पानावर आणि 'गुरमेहर किती चांगली, कशी चांगली, किती गुणी आणि कशी गुणी' असा निबंध वाचल्यागत वाटायला लागलं. पुण्य-नगरीच्या संपादकीय पानाचं पण मला तितकाच कुतूहल वाटतं. उमर खालिद ला भाऊ मानणारी एक नवीन 'Generation' तयार झाली आहे आणि तिचा आणि आमचा काही अर्था-अर्थी संबंध नाही! या संपूर्ण डाव्या आघाडीला समर्थन करणाऱ्या पत्रकारांच्या टोळीला डाव्यांचं राज्य केरळ पाहायला हवं आणि पुन्हा असहिष्णुता बद्दल बोलायला हवं. त्यावेळी माझ्यासारखे तरुण त्यांना 'जाणीवपूर्वक बोला.' अस देखील म्हणणार नाहीत. १९५७ पासून सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केरळमध्ये शरीरसंबंधी गुन्ह्यांचा दर ७५३ इतका आहे. राष्ट्रीय सरासरी २४७ असतांना हा अंकाची कमाल वाटू नये का? सर्वात साक्षार केरळ राज्यात गुन्हे कोणासोबत होतात हे सांगायला नको. 'RSS in Kerala' इतकाच शोध पुरेसा आहे गुगलवर.     
डाव्या आघाडीची नीती वेळोवेळी समजावून सांगितली पाहिजे असं 'संघ' चे विचारक प्रत्येक चॅनल वर सांगत असतात.
आता अजून एक प्रश्न मनाला विचारू शकतो आपण. एकदाचं 'भारत माता कि जय आणि वंदे मातरम' बोलून मिटवून का नाही टाकत हे लोक? कविता कृष्णन, उमर खालिद, येचुरी आणि आता महेश भट्ट यांना पण इतकं फिरवून स्पष्टीकरण देण्यापेक्षा एकदाच बोलून टाकलेलं चांगलं का नाही वाटत? याने एक तर इतका मोठा संघर्ष वाचतो. त्यात तुम्ही ज्यांना 'नकली राष्ट्रवादी' म्हणता त्यांची पण तोंड बंद होऊन जातील. शिवाय पुन्हा तुम्हाला कोणीही देशभक्तीची गाणे गायला प्रवृत्त करणार नाही. पण तुम्ही ते बोलणारच नाहीत. याचं  'संघाच्या दबावाला बाली न पडणे' इतकं साधं सोपं कारण नाही.
              थोडं 'Fact to Fact' चालून पाहू. काश्मीर बद्दल बोलणारी 'लिबरल' मंडळी तुम्हाला गाझा बद्दल पण बोलतांना दिसेल. पण काश्मिरी पंडित आणि बलुचिस्तान बद्दल बोलतांना नाही दिसणार? यातून आपण मुळातच मुद्द्यावरून भटकत नाहीत. चारही गोष्टी तुमच्या मताप्रमाणे एकसोबत ठेवता येत असतील. मग हरकत काय? सीरिया साठी आंदोलन केलेली मंडळी पश्चिम बंगाल मधील 'मालदा आणि पूर्णिया' यांना विसरून का जाते?
उमर खालिद ला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं नाही तर खेद  वाटायला पाहिजे. तितकाच खेद 'तारेक फतेह' यांच्यासाठी पण बाळगून चला. गुरमेहर च्या पूर्ण साप्ताहिकात 'प्रेरणा भारद्वाज' प्रकरण डोळ्यांसमोरून निसटून गेलं आपल्या. विश्वरूपम ला झालेला विरोध आणि पद्मावती साठी एकत्र आलेला 'Bollywood' आपला दशकांपासून आदर्श राहिलाच आहे.

                                   तुम्हाला देशभक्तीसाठी प्रवृत्त करणारी मंडळी घातक असेलही. पण त्यांना सरळ नका सोडून देऊ ज्यांनी तुमच्या विचारांना सुरुवातीपासून काबीज करायचा प्रयत्न केलाय.
अभिव्यक्ती
स्वातंत्र्य (Freedom of Speech) साठी अमेरिकेचं उदाहरण देणाऱ्या प्रत्येकास ठाऊक असायला हवी अशी एक गोष्ट सांगतो, अमेरिकन कायद्याप्रमाणे देशांतर्गत सरकारविरुद्ध अथवा देशाविरुद्ध बोलणाऱ्या किंवा त्यासाठी कट रचणाऱ्या व्यक्तीस तुरुंगात डांबलं जातं. त्याचबरोबर त्या पत्रकारांना देखील ज्यांना अशा व्यक्तीसाठी चांगलं बोलण्याची हौस आहे. अर्थात तिथे अशा लोकांची काळजी दर्शवणे हा देखील गुन्हाच आहे. एक अजून महत्वाची माहिती हवी असेल तर सांगतो. 'उमरखालीद' चे वडील 'SIMI' मध्ये कार्यरत राहिलेले आहेत. हि माहिती आपल्यास ज्ञात असावी, बस इतकचं..


Tuesday, March 7, 2017

आमचा चिंतनकाळ...

१९ ऑक्टोबर २०१४, गंगाखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम दिवस. १९ तारीख निकालाची असल्या कारणाने केंद्रे साहेबांचे योग चांगले असावेत अशी सर्वसाधारण 'पोलिटिकल पंडितांची' मन-धारणा! पैसे वाटपाच्या कार्यक्रमांनी उडालेला गोंधळ गंगाखेड मतदारसंघाचं नाव मोठ्या चर्चेत आणून बसवणारं. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक गंगाखेड आपलं कौल देतं ते राष्ट्रवादीच्या बाजूने! वर्षांपूर्वी गंगाखेड शहरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधून सापडायचा, आज २०१४ मधे  चक्क आमदार येणं आणि तेही निव्वळ जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हा हादरवून टाकणारा मुद्दा. धडपड, सतत संघर्षाची वेळ आणि अगदी ग्राउंड झिरो वक्तव्य या गोष्टींनी केंद्रे साहेबांना मदत तर केली. पण त्याचबरोबर पवार साहेबांच्या पार्टीला 'जनाई नागरी'त चांगला काळ पण पहायला मिळाला.     
      २०११ च्या नगरपरिषद निवडणुकीनंतर गंगाखेड शहराने रोज राजकारण पाहिलं. भांडण-तंट्यासारख्या सुप्त गुणांना मागे ठेवून अडकवण्याची नवीन शैली हस्तगत केली इथल्या राजकारण्यांनी. सलग ३ वर्ष नाट्यमय घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने गंगाखेड 'शहराने' राष्ट्रवादीला समर्थन केले. पैश्यांच्या मागोवावर चालणार मतदारसंघ अशी ओळख पुसून काढली! पण तिथेच काही राष्ट्रवादी बहरली अशातला भाग नाही! अर्थकारणाच्या बाबतीत थकून गेलेले कार्यकर्ते सांभाळणं आता जरुरी होतं. साधा कार्यक्रम घडवून आणायचं म्हटलं की धावपळ व्हायला लागली. जिल्हा अध्यक्ष बदलल्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्ते पुन्हा घौडदौड करायला टाळतांना दिसायला लागले. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नाही अशी साधारण मनधारना लोकांमध्ये पसरायला लागली.
     २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीची तारे कुठपर्यंत जुळतील याचा काहीच नेम नाही. रासप च्या प्रदेश उपाध्यक्षांच्या मनावर चालणारी भाजप यावेळी स्वबळावर उभा टाकलेली दिसली. ५ उमेदवारांच्या शर्यतीती कसोशीने झटणाऱ्या काँग्रेस ला विजय मिळवता आला. गंगाखेड हि खरी राजकारणाची 'गंगा' मानावी लागेल. आपल्या अधिकाराचा रास्त फायदा घेणारी जनता सर्व नेत्यांना थोडं थोडं वाटून देते. राज्यात भाजप चा मुख्यमंत्री, खासदार शिवसेनेचा, आमदार राष्ट्रवादीचा आणि नगराध्यक्ष काँग्रेस चा. त्यावर आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणणारी तरुण मंडळी.
  योग्य कार्यकर्त्यांना वेळीच न दिलेल्या संधी, अपर्याप्त भेटींनी विचारात पडलेली जनता, विकासकामे करून देखील त्याचं 'मार्केटिंग' मार्गी न लावता येणं आणि सामाजिक धास्तीने षंड पडलेला कार्यकर्ता यातून झालेलं खच्चीकरण पहिले नगरपरिषद आणि आता जिल्हा परिषदेच्या निकालातून स्पष्ट झालं.  तुष्टीकरणाचं राजकारण न आवडणारा सामान्य कार्यकर्ता भटकायला लागला हे देखील महत्वाचं. उभय नेत्यांना चांगलं मानणारी लोकं त्यांना भाजप मधल्या काळात जुळलेली आहेत हे आपण समजून घ्यायला हवं होतं. गल्लीतल्या राजकारणात दिल्लीत बसलेल्या लोकांवर टीका करून काहीही साध्य होणार नाही हे समजण्याची गरज आहे आपल्याला. खऱ्या खुऱ्या मानाने धावणारी माणसं समजून घेण्याचं कर्तव्य पार पाडायला हवं आता आपण.  प्याद्यांचं राजकारण समजून गंगाखेड त्यात पूर्णपणे 'Mature' झालेला आहे. ते मुळातच फेकून द्यायला हवं.
   नव्या उमेदीनं सोबत चालायला कार्यकर्ते तयार असतील तर काय हरकत आहे? चांगल्या माणसांनी सदैव साथ असतांना आज ती जवळ भिरकायला का तयार नाहीत हे आपण समजून घ्यायला हवं. आत्मिक बदल कितपत गरजेचं आहे हे अशा वेळीच कळतं. साहेब, कोलमडलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला आता एवढीच मागणी!         

Thursday, March 2, 2017

गुरमेहर, आप आणि देशाची डावी बाजू

गुरमेहर कौर बद्दल वाचलं. अनेक माध्यमातून तिच्याबद्दल आता वाचून आणि ऐकून झालं. विद्वान लोकं  म्हणून आपण ज्यांना मानतो त्यांपैकी काहींना तिला डोक्यावर घेतांना देखील पाहिलं. तशी आता विद्वान माणसं दुर्मिळ. २६ फेब्रुवारी १९७० च्या संसदेतील भाषणात अटल बिहारी वाजपेयी जे 'सेक्युलरिसम' बद्दल बोलले, ते नुसता 'मोदी विरोध आणि अटलजी चांगले होते' म्हणणाऱ्यांनी मनात बिंबवून घ्यावं!
प्रत्यक्षात गुरमेहर कौर चे वडील कारगिल युद्धात नव्हे, ऑगस्ट १९९९ मध्ये काश्मीर मध्ये आतंकवाद्यांशी लढतांना धारार्थी पडले. त्यांचं बलिदान देश कधी विसरला कधी विसरायला हवं. पण वास्तविकता आपण समजून घ्यावी. 'माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युद्धाने मारले.' या वाक्यात कुटून भरलेलं अज्ञान मनाला दुखावतं. दुसरा मुद्दा हा कि गुरमेहर ने व्हिडियो पसरवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या एका कार्यकर्त्याच्या  'Voice of Ram' या चॅनल चा उपयोग केला. हार्दिक पटेल, कन्हैया प्रकरण आणि आता गुरमेहर तिन्ही मध्ये आमआदमी पार्टीची भूमिका अगदी उल्लेखनीय आहे. दिवसेंदिवस वाढते Followers पाहून गुरमेहर चा आत्मविश्वास वाढतांना दिसतो.
 मग एकदा अचानक ती एक 'सोशल मीडिया वर धमकी' मिळाल्याची तक्रार घेऊन येते. रामजस सारख्या एवढ्या उच्च दर्जाच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 'सायबर क्राईम' काय असतं हे माहित नाही हे मुळातच शक्य नाही. धमक्यांची प्रत्येकाने दखल घ्यावी या अनुषंगाने ट्विट केलं  ते ठीक. प्रसारमाध्यमांसमोर बिना पुरावे आपली गाथा मांडणे पण मान्य. पण तक्रार का नाही करायची? तिने मुळात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' वरती आरोप केला. पण इथे '. भा. वि. ' दीडशहानी निघाली म्हणावं . त्यांनीच FIR फाईल केला. दुसरीकडे गुरमेहरने DCW कडे तक्रार दाखल केली. DCW स्वाती मालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली काम करतं  आणि त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या आहेत. DCW आरोपींना अकाउंट Deactivate करायला सांगतं. एवढ्या खालावलेल्या पातळीच्या धमक्या देणाऱ्यांना फक्त Account Deactivation चा समन्स देणं कितपत योग्य होतं?
ABVP  च्या सूत्रांनी तर सरळ डाव्या विद्यार्थी संघटनांवर कट रचल्याचा आरोप केला आहे. धमकी देणारा 'देबोजित भट्टाचार्या' या डाव्या विद्यार्थी संघटना 'AISF' चा कार्यकर्ता असल्याचा थेट आरोप ABVP ने केला आहे. पण त्याचबरोबर किरण रिजिजू यांनी दिल्ली पोलीस ला लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संपूर्ण प्रकरणात सेहवाग, फोगाट भगिनी, रणदीप हुड्डा, इत्यादींनी देश सर्वोतपरी म्हणत आपली बाजू मांडली. तर राणा आयुब, कविता कृष्णन, इत्यादींनी नेहमीप्रमाणे डाव्या आघाडीची बाजू घेतली. जावेद अख्तर ने 'अशिक्षित' म्हणत भारताला सन्मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा अपमान करतांना कसलीही तमा बाळगली नाही. आपला मुलगा फरहान अख्तर ज्या 'मिल्खा सिंह' नामक खेळाडूवर चित्रपट करून नाव आणि कोट्यवधी कमावतो ते मिल्खा सिंह कितपत शिकलेले होते? असा साधा विचारही जावेद अख्तरांनी केला नसावा. 'देशभक्ती पुस्तकातून येत नाही. मी शिकायला जाण्यापूर्वीपासून भारत माता कि जय म्हणते!' अस सरळ ट्विट बबिता फोगाट ने अख्तरांना उद्देशून काढलं!

झालेल्या प्रकरणात आपली बाजू मांडून बरेच व्यक्तिमत्व विश्रांतीस पावले. नंतर चक्क गुरमेहर ने माघार घेतली. तोंडघशी पडलेल्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' मागणाऱ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न पुरेसा होता. संबित पात्रांनी आजतक च्या हल्ला बोल या कार्यक्रमात साकेत बहुगुणा (अ .भ. वि. प.) च्या आवाजात आवाज मिळवून विचारलं ,'आम्हाला अभिव्यक्ती च स्वातंत्र्य नाही का?'
प्रेरणा भारद्वाज या अ .भ. वि. प. च्या कार्यकर्तीस मारहाण केली गेली तो प्रकरण वेगळं ठेवून देखील डाव्या आघाड्यांची बाजू या संपूर्ण प्रकरणात कमकुवत पडतांना दिसते. निखिल वागळे या वरिष्ठ पत्रकारांमधे मोदी, संघ आणि त्या निगडित सर्व गोष्टींशी कमालीचा द्वेष दिसून येतो. इतका कि फक्त गुरमेहर च्या आरोपांवर त्यांनी थेट "अ .भ. वि. प. ने माफी मागावी!" अशी मागणी केली. यावेळी मी त्यांना ट्विटर वर विचारलं कि,'माफी का मागावी? अ .भ. वि. प. ने त्यांच्या पत्राद्वारे अथवा टीव्ही वरती किंवा कोणत्याही माध्यमातून धमकी दिली काय?' याच्या उत्तरार्थ वागळेंनी सांगितले,'हाहाहा! त्यांच्यात इतकी हिम्मत नाही!' वागळेंना ताबडतोब देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या आणि ५ मिनिटात तो ट्विट उडवण्यात आला. हीच नेमकी परिस्थिती आहे सध्याच्या सरकार विरोधी आंदोलनांची!! कोणतीही संघटना विना उपाययोजना, असंबंध आरोप आणि फक्त sympathy गोळा करण्याच्या दृष्टीने सरकारवर हमला करू पाहते आहे. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आणि संपूर्ण देशाचा वेळ वाया जातो.

माझ्या प्रश्नास निखिल वागळेंच उत्तर 

इथं काहीतरी मात्र उघडकीस पडतंय आणि ते आहे 'अजेन्डा'!! सरकारविरोधी आंदोलनाच्या आड देशविरोधी कार्यवाहीचा विरोधी पक्ष पुरस्कृत कार्यक्रम. कधी हार्दिक, कधी कन्हैया, कधी जसलीन कौर तर कधी गुरमेहर बळी पाडून घाणेरडं राजकारण केलं जातंय!