Thursday, March 2, 2017

गुरमेहर, आप आणि देशाची डावी बाजू

गुरमेहर कौर बद्दल वाचलं. अनेक माध्यमातून तिच्याबद्दल आता वाचून आणि ऐकून झालं. विद्वान लोकं  म्हणून आपण ज्यांना मानतो त्यांपैकी काहींना तिला डोक्यावर घेतांना देखील पाहिलं. तशी आता विद्वान माणसं दुर्मिळ. २६ फेब्रुवारी १९७० च्या संसदेतील भाषणात अटल बिहारी वाजपेयी जे 'सेक्युलरिसम' बद्दल बोलले, ते नुसता 'मोदी विरोध आणि अटलजी चांगले होते' म्हणणाऱ्यांनी मनात बिंबवून घ्यावं!
प्रत्यक्षात गुरमेहर कौर चे वडील कारगिल युद्धात नव्हे, ऑगस्ट १९९९ मध्ये काश्मीर मध्ये आतंकवाद्यांशी लढतांना धारार्थी पडले. त्यांचं बलिदान देश कधी विसरला कधी विसरायला हवं. पण वास्तविकता आपण समजून घ्यावी. 'माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युद्धाने मारले.' या वाक्यात कुटून भरलेलं अज्ञान मनाला दुखावतं. दुसरा मुद्दा हा कि गुरमेहर ने व्हिडियो पसरवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या एका कार्यकर्त्याच्या  'Voice of Ram' या चॅनल चा उपयोग केला. हार्दिक पटेल, कन्हैया प्रकरण आणि आता गुरमेहर तिन्ही मध्ये आमआदमी पार्टीची भूमिका अगदी उल्लेखनीय आहे. दिवसेंदिवस वाढते Followers पाहून गुरमेहर चा आत्मविश्वास वाढतांना दिसतो.
 मग एकदा अचानक ती एक 'सोशल मीडिया वर धमकी' मिळाल्याची तक्रार घेऊन येते. रामजस सारख्या एवढ्या उच्च दर्जाच्या कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला 'सायबर क्राईम' काय असतं हे माहित नाही हे मुळातच शक्य नाही. धमक्यांची प्रत्येकाने दखल घ्यावी या अनुषंगाने ट्विट केलं  ते ठीक. प्रसारमाध्यमांसमोर बिना पुरावे आपली गाथा मांडणे पण मान्य. पण तक्रार का नाही करायची? तिने मुळात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' वरती आरोप केला. पण इथे '. भा. वि. ' दीडशहानी निघाली म्हणावं . त्यांनीच FIR फाईल केला. दुसरीकडे गुरमेहरने DCW कडे तक्रार दाखल केली. DCW स्वाती मालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली काम करतं  आणि त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या आहेत. DCW आरोपींना अकाउंट Deactivate करायला सांगतं. एवढ्या खालावलेल्या पातळीच्या धमक्या देणाऱ्यांना फक्त Account Deactivation चा समन्स देणं कितपत योग्य होतं?
ABVP  च्या सूत्रांनी तर सरळ डाव्या विद्यार्थी संघटनांवर कट रचल्याचा आरोप केला आहे. धमकी देणारा 'देबोजित भट्टाचार्या' या डाव्या विद्यार्थी संघटना 'AISF' चा कार्यकर्ता असल्याचा थेट आरोप ABVP ने केला आहे. पण त्याचबरोबर किरण रिजिजू यांनी दिल्ली पोलीस ला लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
संपूर्ण प्रकरणात सेहवाग, फोगाट भगिनी, रणदीप हुड्डा, इत्यादींनी देश सर्वोतपरी म्हणत आपली बाजू मांडली. तर राणा आयुब, कविता कृष्णन, इत्यादींनी नेहमीप्रमाणे डाव्या आघाडीची बाजू घेतली. जावेद अख्तर ने 'अशिक्षित' म्हणत भारताला सन्मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा अपमान करतांना कसलीही तमा बाळगली नाही. आपला मुलगा फरहान अख्तर ज्या 'मिल्खा सिंह' नामक खेळाडूवर चित्रपट करून नाव आणि कोट्यवधी कमावतो ते मिल्खा सिंह कितपत शिकलेले होते? असा साधा विचारही जावेद अख्तरांनी केला नसावा. 'देशभक्ती पुस्तकातून येत नाही. मी शिकायला जाण्यापूर्वीपासून भारत माता कि जय म्हणते!' अस सरळ ट्विट बबिता फोगाट ने अख्तरांना उद्देशून काढलं!

झालेल्या प्रकरणात आपली बाजू मांडून बरेच व्यक्तिमत्व विश्रांतीस पावले. नंतर चक्क गुरमेहर ने माघार घेतली. तोंडघशी पडलेल्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' मागणाऱ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न पुरेसा होता. संबित पात्रांनी आजतक च्या हल्ला बोल या कार्यक्रमात साकेत बहुगुणा (अ .भ. वि. प.) च्या आवाजात आवाज मिळवून विचारलं ,'आम्हाला अभिव्यक्ती च स्वातंत्र्य नाही का?'
प्रेरणा भारद्वाज या अ .भ. वि. प. च्या कार्यकर्तीस मारहाण केली गेली तो प्रकरण वेगळं ठेवून देखील डाव्या आघाड्यांची बाजू या संपूर्ण प्रकरणात कमकुवत पडतांना दिसते. निखिल वागळे या वरिष्ठ पत्रकारांमधे मोदी, संघ आणि त्या निगडित सर्व गोष्टींशी कमालीचा द्वेष दिसून येतो. इतका कि फक्त गुरमेहर च्या आरोपांवर त्यांनी थेट "अ .भ. वि. प. ने माफी मागावी!" अशी मागणी केली. यावेळी मी त्यांना ट्विटर वर विचारलं कि,'माफी का मागावी? अ .भ. वि. प. ने त्यांच्या पत्राद्वारे अथवा टीव्ही वरती किंवा कोणत्याही माध्यमातून धमकी दिली काय?' याच्या उत्तरार्थ वागळेंनी सांगितले,'हाहाहा! त्यांच्यात इतकी हिम्मत नाही!' वागळेंना ताबडतोब देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायला लागल्या आणि ५ मिनिटात तो ट्विट उडवण्यात आला. हीच नेमकी परिस्थिती आहे सध्याच्या सरकार विरोधी आंदोलनांची!! कोणतीही संघटना विना उपाययोजना, असंबंध आरोप आणि फक्त sympathy गोळा करण्याच्या दृष्टीने सरकारवर हमला करू पाहते आहे. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आणि संपूर्ण देशाचा वेळ वाया जातो.

माझ्या प्रश्नास निखिल वागळेंच उत्तर 

इथं काहीतरी मात्र उघडकीस पडतंय आणि ते आहे 'अजेन्डा'!! सरकारविरोधी आंदोलनाच्या आड देशविरोधी कार्यवाहीचा विरोधी पक्ष पुरस्कृत कार्यक्रम. कधी हार्दिक, कधी कन्हैया, कधी जसलीन कौर तर कधी गुरमेहर बळी पाडून घाणेरडं राजकारण केलं जातंय!

No comments:

Post a Comment