Tuesday, March 7, 2017

आमचा चिंतनकाळ...

१९ ऑक्टोबर २०१४, गंगाखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम दिवस. १९ तारीख निकालाची असल्या कारणाने केंद्रे साहेबांचे योग चांगले असावेत अशी सर्वसाधारण 'पोलिटिकल पंडितांची' मन-धारणा! पैसे वाटपाच्या कार्यक्रमांनी उडालेला गोंधळ गंगाखेड मतदारसंघाचं नाव मोठ्या चर्चेत आणून बसवणारं. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक गंगाखेड आपलं कौल देतं ते राष्ट्रवादीच्या बाजूने! वर्षांपूर्वी गंगाखेड शहरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधून सापडायचा, आज २०१४ मधे  चक्क आमदार येणं आणि तेही निव्वळ जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हा हादरवून टाकणारा मुद्दा. धडपड, सतत संघर्षाची वेळ आणि अगदी ग्राउंड झिरो वक्तव्य या गोष्टींनी केंद्रे साहेबांना मदत तर केली. पण त्याचबरोबर पवार साहेबांच्या पार्टीला 'जनाई नागरी'त चांगला काळ पण पहायला मिळाला.     
      २०११ च्या नगरपरिषद निवडणुकीनंतर गंगाखेड शहराने रोज राजकारण पाहिलं. भांडण-तंट्यासारख्या सुप्त गुणांना मागे ठेवून अडकवण्याची नवीन शैली हस्तगत केली इथल्या राजकारण्यांनी. सलग ३ वर्ष नाट्यमय घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने गंगाखेड 'शहराने' राष्ट्रवादीला समर्थन केले. पैश्यांच्या मागोवावर चालणार मतदारसंघ अशी ओळख पुसून काढली! पण तिथेच काही राष्ट्रवादी बहरली अशातला भाग नाही! अर्थकारणाच्या बाबतीत थकून गेलेले कार्यकर्ते सांभाळणं आता जरुरी होतं. साधा कार्यक्रम घडवून आणायचं म्हटलं की धावपळ व्हायला लागली. जिल्हा अध्यक्ष बदलल्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्ते पुन्हा घौडदौड करायला टाळतांना दिसायला लागले. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नाही अशी साधारण मनधारना लोकांमध्ये पसरायला लागली.
     २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीची तारे कुठपर्यंत जुळतील याचा काहीच नेम नाही. रासप च्या प्रदेश उपाध्यक्षांच्या मनावर चालणारी भाजप यावेळी स्वबळावर उभा टाकलेली दिसली. ५ उमेदवारांच्या शर्यतीती कसोशीने झटणाऱ्या काँग्रेस ला विजय मिळवता आला. गंगाखेड हि खरी राजकारणाची 'गंगा' मानावी लागेल. आपल्या अधिकाराचा रास्त फायदा घेणारी जनता सर्व नेत्यांना थोडं थोडं वाटून देते. राज्यात भाजप चा मुख्यमंत्री, खासदार शिवसेनेचा, आमदार राष्ट्रवादीचा आणि नगराध्यक्ष काँग्रेस चा. त्यावर आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणणारी तरुण मंडळी.
  योग्य कार्यकर्त्यांना वेळीच न दिलेल्या संधी, अपर्याप्त भेटींनी विचारात पडलेली जनता, विकासकामे करून देखील त्याचं 'मार्केटिंग' मार्गी न लावता येणं आणि सामाजिक धास्तीने षंड पडलेला कार्यकर्ता यातून झालेलं खच्चीकरण पहिले नगरपरिषद आणि आता जिल्हा परिषदेच्या निकालातून स्पष्ट झालं.  तुष्टीकरणाचं राजकारण न आवडणारा सामान्य कार्यकर्ता भटकायला लागला हे देखील महत्वाचं. उभय नेत्यांना चांगलं मानणारी लोकं त्यांना भाजप मधल्या काळात जुळलेली आहेत हे आपण समजून घ्यायला हवं होतं. गल्लीतल्या राजकारणात दिल्लीत बसलेल्या लोकांवर टीका करून काहीही साध्य होणार नाही हे समजण्याची गरज आहे आपल्याला. खऱ्या खुऱ्या मानाने धावणारी माणसं समजून घेण्याचं कर्तव्य पार पाडायला हवं आता आपण.  प्याद्यांचं राजकारण समजून गंगाखेड त्यात पूर्णपणे 'Mature' झालेला आहे. ते मुळातच फेकून द्यायला हवं.
   नव्या उमेदीनं सोबत चालायला कार्यकर्ते तयार असतील तर काय हरकत आहे? चांगल्या माणसांनी सदैव साथ असतांना आज ती जवळ भिरकायला का तयार नाहीत हे आपण समजून घ्यायला हवं. आत्मिक बदल कितपत गरजेचं आहे हे अशा वेळीच कळतं. साहेब, कोलमडलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला आता एवढीच मागणी!         

No comments:

Post a Comment