Wednesday, May 3, 2017

'सक्षम' होतंय गंगाखेड?

'एक एप्रिल पासून  प्लास्टिक पिशव्या बंद!' सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांच्या सूचनेचं गंगाखेडतील नागरिकांनी स्वागत केलं. बऱ्याच अंशी अशा योजना शहरात काम करतांना दिसत आहेत. गंगाखेडातील नागरिक जागरूक होतो आहे.

                          २००५-०६ च्या शहरात शिकलेल्या १०वि च्या तुकडीने यावर्षी आपल्या कामाच्या आपापल्या कार्यक्षेत्रातील तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात पदार्पण केलं असावं. शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध सोशल माध्यमांतून गप्पा रंगवायला असंख्य Chatting Box पडलेली. फेसबुक आणि व्हाट्सअँप द्वारे बैठक जमली. तारीख ठरवून मंडळींनी Get Together चं आयोजन केलं. शाळेतील आपल्या शिक्षकांना बोलावलं आणि गोदातीरी भरलेल्या बैठकीत ठरवलं एक सामाजिक कार्य हातात घ्यायचं.


                         मित्रमंडळ आणि संघटना आपण भरपूर पहिल्या शहरात. चौकाचौकात सजलेली फ्लेक्स आपल्याला आपल्या एकटेपणाची जाणीव करून देत असतातच! पण इथं उद्धिष्ट ठरवून चांगली कार्य हातात घेणारी समिती नावालापण उरली नाही. अशावेळी एकत्र येऊन 'सक्षम' ची स्थापना केली. तसे २ महिनेच झाले या निर्णयाला. पण गोष्ट उल्लेखनीय आहे. कशी ते पहा. 
  • विविध क्षेत्रात काम करणारे 'सक्षम' सदस्य यांच्यापैकी गंगाखेडात राहणारे सदस्य खूप कमी आहेत. 
  • ठराविक कालांतराने 'फंडिंग' जोडून शिक्षकांना संपर्क साधण्यात येतो. शाळेतील हुशार व गरजू विद्यार्थी शिक्षणाअभावी राहून जाऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. 
  • गणवेश, फीस, वह्या-पुस्तके, इत्यादी शालेय शिक्षणात गरज असलेल्या वस्तू पुरवण्याचं उद्देश्य घेऊन मोहीम वाढवली जाते आहे. 
  • सामाजिक माध्यमांद्वारे कामाची प्रसिद्धी केली जाते, पण यामागे कोण काम करतंय हे नाही दाखवले जात! 
  • फेसबुक वर एक पान आहे Saksham Gangakhed  या नावाने. इथे तुम्हाला यांची कामे पाहायला मिळतील. 
युवकांचा सामाजिक कामांकडे वाढत कल पाहून मनातून समाधान बाळगणारी शिक्षक मंडळी कौतुकाने 'सक्षम'बद्दल बोलत आहे. चांगल्या कामांचा प्रसार व्हायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी मदत करणं पण आवश्यक.
Get Together साठी जमलेली २००५-०६ ची तुकडी 

                          डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, उद्योजक, इत्यादी कार्यक्षेत्रात रुजलेली हि तरूण 'सक्षम'द्वारे सामाजिक कामांसाठी उतरली आहे. २००५_०६ च्या तुकडीचा आदर्श Get Together डोळ्यांसमोर ठेवून चालणाऱ्यांनी लक्षात ठेवावा. विवेक महाजन आणि निकिता लोढा यांच्याशी संपर्क करून मदत करू शकता! 



2 comments:

  1. Replies
    1. Thank you for making 'Saksham' happen. Keep this energy up.
      We are all proud of you 😃

      Delete