Wednesday, May 31, 2017

गंगाखेड परभणी रस्ता अशक्य?

चर्चा.. आपण चर्चा करतो मित्रांशी, गावातल्या, राज्यातल्या, देशातल्या आणि कुठल्यापण. बऱ्याच वेळा आपल्या गावच्या गोष्टी सांगतो. गंगाखेडयातल्या माझ्या मित्रांचा सामान्य ज्ञान भारीच! पण मला शंका वाटते त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या गंगाखेड बद्दल काही माहिती असेल. ज्या शहराचा ३०० वर्षांपासूनचा इतिहास लिखित आहे, त्या शहराला तर नावावरून ओळखला पाहिजे लोकांनी. पण तसं होत नाही. याचं कारण आहे, आपल्याइथं असं काही उरलं नाही. आणि जे काही थोडंफार उरलाय ते सांभाळण्याची आपली इच्छा नाही!
                 गंगाखेड शहर जिल्ह्याला गंगाखेड-परभणी मार्गावरून जोडला जातो. इथल्या रोजच्या वर्दळीची कल्पना असेल तुम्हाला. गंगाखेड बाजारपेठेचं विशिष्ट नावलौकिक आता पुसट व्हायला आलय पण थोडीफार ओळख असल्याने कामे भागतात. इंडस्ट्री च्या नावावर एक साखर कारखाना आहे. शहराबाहेर वसत असलेल्या नवीन मोंढ्यात एक पाईप फॅक्टरी आहे. ४-५ कापूस जिनिंग पण आहेतच. पण नावाला उरलेली कनेक्टिव्हिटी!
मागील ३ वर्षांपासून २ मुद्दे ऐरणीचे मानले जातात. पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीला गंगाखेडला थांबा मिळावा आणि गंगाखेड परभणी रस्ता पुन्हा बनवा.
                  २०१५-१६ साली हायवे च्या प्रस्तावनामध्ये एक रस्ता परळी ते पुसद मार्गे दिग्रस एक राष्ट्रीय मार्ग ७०७ किमी अंतराचा बनवा असा प्रस्ताव आलेला. त्यात गंगाखेड ते परभणी रास्ता अर्थातच समाविष्ट होता. २ पदरी मागणाऱ्यांना ४ पदरी देणारं सरकार महानच! पण तसं अद्याप काही झालं नाही! या रस्त्यासाठी ३८ वर्षांपूर्वी एकदा निधी आला होता. त्यावेळी रस्ता बनला. ७-८ वर्षां पूर्वी पर्यंत इथे टोल वसुली करण्यात आली. रस्त्याची डागडुजी झाल्याचे मात्र दिसत नाही. एकंदरीत गंगाखेडच्या व्यापारावर याचा जबर फटका बसलेला दिसतो. इतकं वाचून झाल्यावर याची कल्पना तुम्हीपण करू शकता.
                                                        आता एकत्र येऊन यासाठी मागणी करायची गरज आहे. त्यासाठी हि ऑनलाईन पिटिशन मी दाखल केली. सन्मानणीय मंत्री महोदयांपर्यंत जेव्हापण आपली गोष्ट पोचेल ती एकत्रित पोचेल.


https://www.change.org/p/government-of-india-reconstruction-of-gangakhed-parbhani-state-highway

या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही स्वतःची माहिती भरावी.


First Name मध्ये आपलं नाव, Last Name मध्ये आपलं आडनाव, Email मध्ये आपली ईमेल आयडी, Postal Code मध्ये ४३१५१४ (आपला पिनकोड) आणि I'm signing becuase मध्ये आपल्याला हा रस्ता का बनावा असे वाटते? ते लिहावे. त्यानंतर SIGN वर क्लिक करून शी करून टाकावी. 

   सदर संकेत स्थळ Change.Org आपली विनंती जास्तीत जास्त सह्या झाल्यास 'ट्रेंड'मध्ये दाखवते. यापूर्वी मनेका गांधी, सुशील कुमार शिंदे, इत्यादी मंत्र्यांनी अशा पिटिशन ची दखल घेतलेली आहे.

बाकी वरील छायाचित्रांकडे पाहून तुमच्या स्वप्नातले गाव आणि त्याला जाणारा रास्त असा नसेल तर सही करून याबाबत जनजागृती करण्यासाठी मदत करावी!
धन्यवाद! 

1 comment:

  1. चार पाहुणे आल्यास केवळ गहण चर्चचा विषय असतो रस्ता ।
    जेवढे पोट तिडकीने रस्त्याचा विषय लोक पाहुण्या समोर मांडतात त्याच्या काही अंशी जरी रस्त्याच्या कामासाठी स्वतःहून प्रयत्न केले तरीही खूप होईल

    ReplyDelete