Monday, June 19, 2017

कोण आहेत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद?



सत्ताधारी भाजप पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विश्वासात घेऊन बिहार चे राज्यपाल श्री. रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. रामनाथ कोविंद यांच्या नावाने दलित समाजाच्या अपेक्षा वाढतील असे चिन्ह आहेत.

  • बिहार चे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर, १९४५ रोजी कानपुर जवळ डेरापुर येथे झाला. 
  • श्री रामनाथ कोविंद दलित समाजातील असून त्यांनी भाजपच्या दलित आघाडीचे १९९८-२००२ मध्ये नेतृत्व केले होते. 
  • कानपुर कॉलेज मधून वकिलीची पदवी त्यांनी घेतलेली आहे. 
  • दोन वेळा भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी वकिलीत करीयर घडवायचे ठरवले. त्यानंतर एक वेळा त्यांची प्रशासकीय सेवेसंतही निवड होऊन देखील त्यांनी त्यास नकार दिला. 
  • १९७७-९३ पर्यंत श्री रामनाथ कोविंद यांनी सरकारी वकील म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात काम पहिले. 
  • १९९४ ते २००६ मध्ये त्यांची राज्यसभेत खासदार पदी राहून काम सांभाळले. दोन्ही वेळा उत्तर प्रदेश मधून त्यांनी निवडणूक जिंकली. 
  • कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या रामनाथ यांनी २०१५ मध्ये बिहार च्या राज्यपालाची भूमिका स्वीकारली. 
एका संभाव्य राष्ट्रपतींना पुढील वाटचालीस शुभेच्छा! शेतकरी दलित पुत्रास अशा मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोचवण्याची ताकद असलेल्या या लोकशाहीस अभिनंदन!! 


No comments:

Post a Comment